| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Sep 13th, 2018

  पालकमंत्र्यांकडे उत्साहात गणेशाची स्थापना

  राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी आज दुपारी गणेश मूर्तीची उत्साहात स्थापना त्यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आली.

  लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आजही तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जात आहे. बुध्दीची देवता असलेल्या गणरायाचे आगमन आज सर्व शहरांमध्ये गावांमध्ये झाले आहे. देशाची 21 व्या शतकाकडे वाटचाल सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्यातील आणि देशातील सर्व नागरिकांना गणरायाने सुखी समृध्द ठेवावे. नैसर्गिक संकटापासून या राज्यातील शेतकर्‍यांला आणि नागरिकांना वाचवावे, अशी प्रार्थना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गणरायाला करून शहर आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

  गणरायाच्या स्थापनेप्रसंगी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी सौ. ज्योती बावनकुळे, मुलगी पायल, जावई लोकेश, बंधू नारायण बावनकुळे व अनेक आप्त आणि मित्र उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145