Published On : Sat, Oct 17th, 2020

झीका इन्स्टिट्यूट तर्फे पेंटींग स्पर्धा

Advertisement

नागपुर : आज संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली दिसत आहे. नुकतेच हाथरस मधील घटना हि आपल्या लक्षात आहे. या करिता अनेक स्वयंसेवी संस्थांनी आवाज उचलून धरला आहे. याच धर्तीवर नवरात्रीच्या पावन पर्वावर झीका इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स या संस्थेच्या वतीने ” स्त्री- हिंसेकरिता की पूजेकरिता” या विषयावर ऑनलाईन पेंटिंग स्पर्धा आयोजित केली आहे.

झीका च्या संचालिका श्रीमती डॉ.पुर्णिमा केदार चिंचमलातपुरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

आपल्या वक्तव्यात डॉ.पुर्णिमा केदार चिंचमलातपुरे यांनी सांगितले की, देशातील स्त्रियांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात बरीच आंदोलन, मोर्चे, कॅडल मार्च झाले आहे. परंतु स्त्री ही एक माता, बहीण किंवा पावन नवरात्रीच्या काळात पूजन करण्यात येत असलेल्या शक्तीचे प्रतीक आहे. आता आपल्याला स्त्रियांच्या अत्याचाराविरोधात आत्मचिंतन करण्याची गरज आहे. म्हणून नवरात्रीच्या पावन प्रसंगी या स्पर्धेच्या माध्यमातून स्त्रीयांचा समाजातील दर्जा काय हे सिद्ध करायचे असल्याचे वक्तव्य डॉ.पुर्णिमा केदार चिंचमलातपुरे यांनी केले आहे.

या स्पर्धेत निशुल्क प्रवेश आहे. व उत्कृष्ट कलाकृतीला नगदी स्वरूपात पुरस्कार, व इच्छुक स्पर्धाकांना कोर्स शुल्कात आकर्षक सूट दिली जाईल. त्याचप्रमाणे निवडक कलाकृती चे प्रदर्शनी च्या माध्यमातून सत्कार करण्यात येईल.स्पर्धकाने आपली प्रवेशिका ऑनलाइन पद्धतीने पाठवावी. अधिक माहिती करिता 7558683112 किंवा 9011009944 या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे.