नागपूर:भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय वायुदलाच्या या निर्णायक कारवाईचे देशभरातून स्वागत होत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील याला ठाम पाठिंबा दिला आहे.
संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देत ही कारवाई “पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाल्याची सुरुवात” असल्याचं सांगितलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले,पहलगामच्या पीडितांना न्याय मिळाला ‘ऑपरेशन सिंदूर. राष्ट्र यास समर्थन देत आहे. जय हिंद, भारत माता की जय!
देशातील जनतेमध्ये या एअर स्ट्राईकबाबत आनंदाचे वातावरण असून, विविध ठिकाणी उत्सव साजरे केले जात आहेत. पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. आता भारतीय हवाई दलाच्या या कारवाईमुळे जनतेच्या भावनांना उत्तर मिळालं असल्याचं दिसत आहे. सरकारच्या या निर्णयाला फक्त लष्करी क्षेत्रातूनच नव्हे तर सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय संघटनांकडूनही भरभरून समर्थन मिळत आहे. संघाने केलेलं हे वक्तव्य भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्याला जनतेच्या पाठिंब्याची ताकद मिळवून देत आहे.