Published On : Mon, Aug 5th, 2019

पाराशीवनी चे साटक येथे श्री पद्धतीने धान लागवड

पारशिवनी(नागपुर) : – पारशिवनी तालुक्यात दुष्काळ सदुष परिस्थिती व पेंच धरणाचे पाणी मिळण्याची हमी नसताना तालुका कृषी अधिकारी हयानी शेतकऱ्याचे मनोबल वाढविण्याकरिता स्वत:आपल्या सहकार्यासह उपस्थित राहुन साटक येथे शेतकऱ्याच्या शेतात ” श्री ” पध्दतीने धानाची रोहणी करून शेतकऱ्याना प्रोत्साहित व मनोधैर्य वाढविण्याचा सार्थक प्रयत्न करण्यात आला.

पेंच धरणाच्या पाण्यामुळे पारशिवनी, रामटेक, मौदा व भंडारा जिल्हा या भागा त मोठय़ा प्रमाणात धान शेती करून शेतकरी कसातरी सुखी होत असताना च पेंच धरणाच्या वरच्या बाजुला मध्य प्रदेशातील चौराई येथे मोठे धरण बांधण्यात आल्याने मागील दोन वर्षा पासुन पेंच धरणाचे पाणी नागपुर शहराकरिता पिण्याकरिता ३० % पाणी शिल्लक ठेवण्यात येऊन शेतीकरिता

पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने धान उत्पादक शेतकऱ्याला पेंच धरणाचे पाणी पुरवठा न झाल्याने भयंकर बिकट परिस्थितीचा सामना करावा लागल्याने हताश होऊन कोरड वाहु शेतीकडे वळत असताना तसेच जुन, जुलै महिन्याच्या दिर्घ प्रतिक्षे नंतर पारशिवनी तालुक्यात काही का प्रमाणात ऑगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने पारशिवनी तालुक्या तील कन्हान मंडळतील साटक येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय पारशिवनी यांच्या वतीने शुक्रवार (दि.२) ऑगस्ट ला साटक येथील प्रगतशील शेतकरी श्री मंगेश किसन हिंगे यांच्या शेतात “श्री ” पध्दतीने धान लागवडीचे प्रात्याक्षिक पारशिवनी तालुका कृषी अधिकारी श्री जी बी वाघ यांच्या सह कृषी सहायक श्री के बी ठोंबरे, श्री जे बी भालेराव व श्री ए एन देशमुख हयानी धान शेतकऱ्याचे मनोबल वाढविण्या करिता अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः बांधीत उतरून पूर्ण धान लागवड होई पर्यंत काम केले.

आणि जगाचा पोशिंदा जर नैसर्गिक व आधुनिक आपत्तीला हताश होईल तर हे जग, ही जनता कशी जगेल. कष्टकरी शेतकरी जर हिमतीने, खंबीरपणे जगाला जगवि ण्याकरिता, पोषण करण्याकरिता उभा राहिला तर या नैसर्गिक व आधुनिक आपत्तीना शेतकऱ्या समोर नतमस्तक व्हावे लागले. अशी प्रेरणा, उत्सफुर्ती, मनोधर्य वाढविण्याच्या सार्थक प्रयत्न पारशिवनी तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने साटक येथे ” श्री ” पध्दतीने धान रोहणी करून करण्यात आल्याने परिसरात धान लावणीला उशिरा का होईना सुरूवात झाली आहे.