Published On : Thu, Feb 25th, 2021

कामठी नागपूर मार्गावरील राज लॉयन लॉन प्रशासनाने केला सील,

Advertisement

लॉन मालक,वर, वधूच्या नातेवाईकासह चौघा विरोधात नवीन कामठी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

-जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली

कामठी :- कोविड 19 च्या नियमाला धाब्यावर ठेवून जिल्हा प्रशासणाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दीड ते दोन हजार नातेवाईक लग्नसोहळ्यात सहभागी करून स्वतःची प्रतिष्ठा उज्वल करण्यासाठी कामठी नागपूर मार्गावरील राज लॉयन लॉन न्यूयेरखेडा येथे आयोजित लग्नसोहळ्यात पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या पथकाने धाड मारून लॉन मालक, वर, वधू च्या नातेवाईकासह चौघा विरोधात जुनी कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून लॉन पुढील आदेशापर्यंत शील केल्याची कारवाई गुरुवारला रात्री 10 वाजता सुमारास केली

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेंद्र सिंग गुरुदत्त सिंग वय 54 राहणार वैशाली नगर नागपूर यांच्या मालकीचे कामठी नागपूर मार्गावरील न्यू येरखेडा येथे राज लॉयन लॉन असून त्यांनी गुरुवारला सायंकाळी सात वाजता सुमारास भाड्याने नागपूर येथील मोहम्मद असलम मोहम्मद सिद्दीकी वय 55 राहणार संघर्ष नगर ऑटोमोटिव चौक नागपूर यांच्या दोन मुलाचा लग्न सोहळा शेख निसार वय 50 राहणार लोधीपुरा गणेश पेठ नागपूर यांची मुलगी तर शौकत अली वय 52 राहणार कोराडी यांच्या मुली सोबत विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता विवाह सोहळ्यात दीड ते दोन हजार नातेवाईक सहभागी झाले होते

वाढत्या कोरोणाचा पादुर्भाव बघता जिल्हा अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मंगल कार्यालय लॉन मध्ये आयोजित लग्न सोहळ्यात केवळ 50 नागरिकांना नियमाचे पालन करून लग्नाची परवानगी देण्यात आली असता सदर विवाह सोहळ्यात जिल्हाधिकारी याच्या आदेशाला केराची टोपली दाखवत लॉन मालक सुरेंद्र सिंग , वर, वधूच्या दीड ते दोन हजार नातेवाईक मोठ्या प्रमाणात लग्न सोहळ्यात सहभागी झाल्याची ची माहिती पोलिस उपायुक्त निळोटपल यांना माहीत होताच त्यांनी नवीन कामठीचे ठाणेदार संजय मेंढे , तहसीलदार अरविंद हिंगे यांना घटनास्थळी बोलावून संयुक्तरीत्या राज लॉयन लॉन वर धाड मारली असता लग्नसोहळ्यात दीड ते दोन हजार नागरिक तोंडाला मास्क न बांधता, सामाजिक सुरक्षा अंतर न ठेवता, कोविड 19 चे नियम धाब्यावर बसवून सहभागी झाल्याचे दिसून येताच पोलिसांनी धाड मारून लॉनचे मालक सुरेंद्र सिंग गुरुदत्त सिंग, वराचे वडील मोहम्मद अस्लम मोहम्मद सिद्दिकी ,वधूचे वडील शेख निसार, शौकत अली यांचे विरोधात नवीन कामठी पोलिस स्टेशनला कलम 188, 269, 270, 34 भादवी सहकलम साथी रोग नियंत्रण अधिनियम 1897 कलम 34 नुसार गुन्हा दाखल करून पुढील आदेशापर्यंत लॉन सील केले आहेत वरील कारवाई पोलीस उपायुक्त निलोतल्प यांचे मार्गदर्शनात नवीन कामठी चे ठाणेदार संजय मेंढे दुय्यम निरीक्षक सुरेश कन्नाके ,वीजय भिसे, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, राजेंद्र टाकळीकर, मंगेश यादव, सुरेंद्र शेंडे, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव ,संदीप गुप्ता यांच्या पथकाने कारवाई केली

संदीप कांबळे कामठी