Published On : Mon, Jan 3rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

बाजारात विना मास्क फिरणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची दंडात्मक कारवाई

Advertisement

15 ते 18 वयोगट ; 14 हजार लसीकरण

India crosses 75 cr Covid vaccine doses: Govt

नागपूर : नागपूर जिल्हा प्रशासनाने वाढते रुग्ण लक्षात घेतात बाजारातील बेपर्वा वृत्तीच्या लोकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. आज कळमना बाजार परिसरात विना मास्क गर्दी करणाऱ्या 16 लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर दंड न भरू न शकणाऱ्या दहा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटात आज 14 हजार 654 तरुणांचे पहिल्या दिवशी लसीकरण झाले.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहरात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. शहर तिसरा लाटेच्या वाटेवर असताना अनेकजण बेपर्वाईने वागत आहे. अशा बेपर्वा वृत्तीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शहरात, जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात विना मास्क फिरणारयांवर कारवाई करण्यात येत आहे. परिस्थिती हळूहळू विस्फोटक होत असून नागरिकांनी तातडीने आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

आज कळमना मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात विना मास्क भटकंती सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर नागपूर तहसील कार्यालय, नागपूर शहर, नागपूर महानगरपालिकेचे लकडगंज झोन कार्यालय, कळमना पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तहसीलदार सूर्यकांत पाटील, यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी अनिल ब्राह्मणे, तलाठी सोमलकर, सहाय्यक आयुक्त विजय होणे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. 16 नागरिकांकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. तर पाचशे रुपये दंड भरू न शकणाऱ्या दहा लोकांविरुद्ध पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले.

युवकांचे लसीकरणाला उत्तम प्रतिसाद
दरम्यान, ग्रामीण भागात आजपासून सुरू झालेल्या 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज पहिल्याच दिवशी 6 हजार 615 मुलांचे लसीकरण करण्यात आले. उपलब्ध आकडेवारीनुसार 1 लक्ष 32 हजार 832 या वयोगटातील लसीकरण योग्य संख्या आहे. शहरात आज 8 हजार 39 तरुणांचे लसीकरण झाले. नागपूर जिल्हयात एकूण 14 हजार 654 जणांचे लसीकरण झाले.

Advertisement
Advertisement