Published On : Tue, Aug 18th, 2020

कामठी तालुका कोरोना मुक्तीच्या मार्गावर 1102 कोरोनाबधित रुग्णापैकी 848 रुग्ण झाले बरे

आज एकूण 14 रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळले , शहरात सात तर ग्रामीण मध्ये सात रुग्ण कोरोनाबधित

कामठी :-कामठी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भावाने गती घेत 39 रुग्ण कोरोना पोजिटिव्ह होऊन मृत्यु मुखी पडल्याने नागरिकांत एक अनामिक भीती निर्माण होत कोरोना विषयो सहज भूमिका घेणाऱ्या नागरिकांनी सुद्धा स्वतःची काळजी घेत प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सुरू केले परिणामी सध्यस्थीतीत कामठी तालुका कोरोना मुक्तीच्या मार्गावर असून आजपावेतो आढळलेल्या 1102 कोरोना बाधित रुग्णापैकी 848 रुग्ण कोरोनावर मात करून बरे होऊन घरी परतले आहेत तर सध्यस्थीतीत 215 रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत असून हे सुद्धा कोरोनावर मात करून घरी सुरक्षित परतणार असा विश्वास प्रशासनाला आहे.तर आज 150 च्या आत झालेल्या कोरोना चाचणी तपासणीत अहवालात 14 रुग्ण हे कोरोनाबधित आढळले ज्यामध्ये शहरातील सात तर ग्रामीण चे सात रुग्णाचा समावेश आहे.

यानुसार आज कामठी तालुक्यात 14 रुग्ण आढळले ज्यामध्ये शहरातील सात रुग्ण कोरोनाबधित आढळले ज्यामध्ये हरदास नगर 01, मोंढा 01, गवळीपूरा 01, नया गोदाम 02, जयभीम चौक 01, व कुंभारे कॉलोनी च्या एक रुग्णाचा समावेश आहे तसेच ग्रामीण च्या सहा रुग्णामध्ये खसाळा 02,गुमथी 01, पांजरा 02, भिलगाव 02 रुग्णाचा समावेश आहे.

संदीप कांबळे कामठी