Published On : Tue, Jun 4th, 2019

जागतिक योग दिवसाचे नागपुरात २१ जूनला आयोजन

Advertisement

महापौर नंदा जिचकार : आयोजनासंदर्भात घेतली प्राथमिक बैठक

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ जून रोजी जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे नागपूर महानगरपालिकेच्या नेतृत्वात विविध योगाभ्यासी मंडळ आणि संस्थांच्या सहकार्याने भव्य आयोजन करण्यात येत आहे. या आयोजनात योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांसह नागरिकांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘योग दिवस’ आयोजनसंदर्भात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात सोमवारी (ता. ३) प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपायुक्त नितीन कापडणीस, सहायक आयुक्त महेश मोरोणे, अशोक पाटील, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, सहायक अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपअभियंता कल्पना मेश्राम, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सुनील सिर्सीकर, प्रशांत राजूरकर, राहुल कार्लटकर, नागपूर जिल्हा योग असोशिएशनचे अमित मोहगावकर, डॉ. गंगाधर कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी योग दिवस आयोजन तयारीबाबतची माहिती दिली. शहरातील नागरिकांना विविध भागातून येण्यासाठी बसेसची व्यवस्था, कार्यक्रमस्थळी योग साधकांसाठी करण्यात येणारी पाण्याची व्यवस्था, कार्यक्रमासंबंधीची रूपरेषा आदी माहिती महापौर नंदा जिचकार यांनी जाणून घेतली. कार्यक्रमस्थळी पावसाची शक्यता लक्षात घेता आवश्यक त्या सोयी करण्यात याव्यात. स्वच्छतेची खबरदारी घ्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणीही कागदी पत्रके वाटणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.

१० जूनला बैठक
योग दिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने आणि विविध संस्थांच्या सूचना जाणून घेण्याच्या दृष्टीने १० जून रोजी नागपूर महानगरपालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीत आयोजनात सहभागी होणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement