Published On : Fri, Oct 26th, 2018

रामटेक येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथा आणि भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन

रामटेक : प्रभू श्रीरामचंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या रामटेक नगरीत कार्तिक मासाच्या शुभ पर्वावर नेहरू मैदानात अष्टोत्त्तर शत (108)संगीतमय श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथा ,भव्य श्री राम यज्ञ आणि चित्रकूटच्या रामलिलेचे आयोजन दिनांक 31 ऑक्टोम्बर पासून ते 6 नोव्हेंबर 2018 पर्यंत करण्यात आलेले आहे.

प्रतिदिन पंच कुंडीय राम यज्ञ सकाळी 8 ते 2 पर्यंत 12 ब्राम्हणाद्वारे होत असून वैदिक मंत्राद्वारे यज्ञात लाखो आहुती दिल्या जाणाऱ आहेत. प्रतिदिन दुपारी 3 ते 7 पर्यंत भागवत सप्ताहात भागवत काठाव्यास श्रदेय नंदकिशोरजी पांडेय यांच्या सुमधुर वाणीतून कथा ऐकायला मिळेल.प्रतिदिन सायंकाळी 7 ते 10 पर्यंत चित्रकूटची प्रसिध्द रामलिला सादर केली जाईल. यातून प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र मंचावर सादर केले जाणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी भागवत कथेचा संकल्प केलेला आहे त्यांच्यासाठी 108 ब्राम्हणवृंदादवारा भागवतया कथेचा मूलपाठ कथास्थळावर कथामंडपात केला जाणार आहे.

भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमास अनंत श्री विभूषित श्री रविशंकर जी महाराज “रावतपुरा सरकार” यांची विशेष उपस्थिती व आशीर्वाद लाभणार आहेत.यावेळी दिनांक 31 ऑकटोम्बर ला सकाळी 10 ला अठरा भुजा गनपती मंदिर येतून नेहरू ग्राऊंड पर्यंत कलश यात्रा निघेल.


या भव्य धार्मिक कार्यक्रमाचा लाभ रामटेक नगरीतील व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत आयोजक पंडित विकास दुबे ,सुनील रावत ,अनुराग दुबे, रितेश शर्मा,प्रतीक राघोर्ते, आणि श्रीराम यज्ञ समिती ,रामटेकच्या वतीने कळविण्यात आले आहे.