Published On : Wed, Sep 27th, 2017

न प द्वारे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कामठी: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारा नगर परिषद प्रांगणात बालका करिता निशुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन आज सोमवार करण्यात आले होते नगरपरिषद उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान यांनी शिबिराचे उद्घाटन केले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी,हृदयरोगतज्ज्ञ डॉ रुकेश रामटेके यांनी जवळपास 170 रुग्णांची तपासणी केली व औषधोपचार केले यावेळी मुख्याधिकारी मनोज देसाई विरोधीपक्ष नेते लालसिंग यादव,नगरसेवक मोहम्मद आरीफ कुरेशी नगरसेविका संध्या रायबोले, मीनाक्षी बुरबुरे,प्रतीक पडोळे, तसेच नागसेन गजभिये,मोहम्मद जमाल,शाहिद युसूफी,आशा ठाकरे,एम बी तिबुडे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमच्या यशस्वीते विशाल माटे, अनिल नान्हे, सत्यप्रभा मेंढे,,यामिनी बोरकर, स्वाती वाघमारे, स्वाती भवसागर,सीमा नगरारे,रंजना कौरथी, स्वीटी रामटेके,प्रियंका जँगी, राजू कोकर्डे यांनी सहकार्य केले