Published On : Wed, Sep 30th, 2020

विधेयकाला विरोध, कांग्रेसचे 2 ऑक्टोंबर ला आंदोलन

Advertisement

2 ऑकटोबर ला कामठी -मौदा विधानसभा क्षेत्रातील शेतकरी व कामगार बचाव धरणे आंदोलन

कामठी :-केंद्र सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी व कामगार विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून नवीन आणलेल्या काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी आणि कामगार पूर्णपणे उध्वस्त होणार आहे या विधेयकाच्या विरोधात , अन्यायाविरुद्ध व अन्यायग्रस्त कायद्याच्या विरोधात कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी , खासदार राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनार्थ कांग्रेसतर्फे 2 ऑकटोबर ला कामठी मौदा विधानसभा क्षेत्रातील कामठी, मौदा व नागपूर ग्रामीण तालुक्यात तालुकास्तरीय आंदोलन छेडले जाणार आहे

यानुसार कामठी तालुक्यात सकाळी 11 वाजता, मौदा तालुक्यात दुपारी 12 वाजता तसेच नागपूर ग्रामीण तालुक्यात पिपळा फाटा येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महसचिव व माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत दिली.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले, जी प चे स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिकाताई लेकुरवाडे, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, पंचायत समिती चे माजी सभापती प्रभाकर मोहोड, कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव, कांग्रेस पदाधिकारी राजकुमार गेडाम, मेघराज गीऱ्हे, रमेश लेकुरवाडे, कांग्रेस सेवादल शहराध्यक्ष मो सुलतान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

दोन ऑकटोबर ते 31 ऑकटोबर दरम्यान कामठी मौदा विधानसभा क्षेत्रात वेळोवेळी विविध आंदोलने छेडली जाणार आहेत त्यात सर्वप्रथम 2 ऑकटोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कामठी तुन धरणे आंदोलनची सुरुवात करण्यात येणार आहे तसेच मोर्चा काढून शेतकरी विधेयके तात्काळ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. आंदोलन स्थळी आंदोलन केल्यानंतर त्या तालुक्यातील तहसीलदार ला सामूहिक निवेदन देण्यात येईल तसेच हे आंदोलन करतेवेळी कोरोना महामारीमुळे सरकारने लागू केलेल्या त्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाणार असल्याची माहिती सुरेशभाऊ भोयर यांनी दिली.

देशातील शेतकरी , आडती , कामगार , कर्मचारी व लाखो लोकांचे या काळ्या विधेयकावर आक्षेप आहेत.वास्तविकता सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समित्या तयार करण्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सहकार महर्षी स्व बाबासाहेब केदार, माजी मुख्यमंत्री शरद पवार यासारख्या दिग्गज नेत्यांचा मोलाचा वाटा आहे मात्र केंद्र सरकारने आणलेल्या या काळ्या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही व्यवस्थाच पूर्णपणे नष्ट होणार आहे.बाजार समिती व्यवस्था संपुष्टात येताच या बाजार समितीत काम करणारे तसेच या व्यवस्थेवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असलेले कामगार, मजूर, आडते, मुनीम,हमाल यांच्यासह लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि याचा परिणाम राज्य सरकारच्या म्हसुलावरही होणार आहे .केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा हा भारतीय संविधानाच्या विरोधात असून संघराज्य प्रणालीवर सरळ सरळ हल्ला आहे .कोरोना महामारीच्या आडून शेतकऱ्याचे संकट ‘मूठभर उद्योगपतींच्या संधी मध्ये बदलून देण्याचा मोदी सरकारचा हा डाव देशातील शेतकरी व शेतमजूर कधीही विसरणार नाहीत .

तेव्हा या केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यात कांग्रेसच्या वतीने 2 ऑक्टोबर ला शेतकरी व कामगार बचाव धरणे आंदोलन करण्यात येणार आहे

यावेळी कामठी मौदा विधानसभा मतदार संघातील कामठी ,नागपूर ग्रामीण तसेच मौदा तालुक्यातील कांग्रेस चे समस्त पदाधिकारी, लोकप्रतिनिधी , कार्यकर्ते राहणार आहेत तसेच 10 ऑकटोबर रोजी राज्यस्तरीय किसान संममेलन होणार आहे या किसान संमेलनातून भाजपाने केलेल्या या अन्यायग्रस्त कायद्याच्या विरोधात आवाज उठवला जाणार आहे तसेच 2 ऑकटोबर ते 31 ऑकटोबर दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे.

संदीप कांबळे कामठी