Published On : Wed, Sep 30th, 2020

अवैध दारू वाहतूक दारास अटक

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील पंकज मंगल कार्यालय समोरून एक इसम काळ्या व लाल रंगाच्या दुचाकी क्र एम एच 31 बी सी 7376 ने अवैधरित्या देशी दारू चे दोन खोके वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून या अवैध दारू वाहतूक दारास अटक करण्याची यशस्वी कारवाही आज सकाळी 9 वाजता केली असून या धाडीतून अवैध देशी दारू किमती सहा हजार रुपये व जप्त दुचाकी किमती 30 हजार रुपये असा एकूण 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी नरेंद्र कवरे वय 25 वर्षे रा कळमना वर कायदेशीर रित्या गुन्हा नोंदविता अटक करण्यात आले.

ही यशस्वी कारवाही पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस कर्मचारी पप्पू यादव,मंगेश लांजेवार, सुरेंद्र, सुधीर कनोजिया, संदीप गुप्ता, आदींनी केली असून पुढिल तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी