Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 27th, 2019

  कुंभार समाजाला ऑनलाईन उत्पादने विक्रीची संधी: अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

  संकेतस्थळ होतेय तयार, आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न.

  इ कुंभार वेब साईट चे डाँक्टर हेमंत जांभेकर, आणि समन्वयक श्री अजित पारसे

  नागपूर, गेल्या काही वर्षात कुंभार समाज उपेक्षित जीवन जगत असून त्यांच्यातील कलेच्या अस्तित्वावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. मात्र, आता त्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांना ऑनलाईन विक्रीसाठी संकेतस्थळ तयार करण्यात येत असून त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्नासाठी ‘माती-आमची ओळख, आमचा विश्‍वास’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

  केंद्रीय मंत्री मा.श्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शना नुसार व साहाय्य तेने सिताबर्डी येथे आजपासून खादी व ग्रामोद्योग आयोगातर्फे खादी प्रदर्शनीला सुरुवात झाली.

  याच प्रदर्शनीत कुंभार कलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ऑनलाईन प्रयत्न करण्याबाबत ‘माती-आमची ओळख, आमचा विश्‍वास’ अशी स्टॅण्डी लागलेले स्टॉल लक्ष वेधून घेत आहे. या स्टॉलला आज पहिल्याच दिवशी उत्सुकतेपोटी अनेकांनी भेट दिली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने कुंभार समाजासाठी तयार करण्यात आलेले व्यासपीठ म्हणजे ‘माती-आमची ओळख, आमचा विश्‍वास’ हा उपक्रम असल्याचे प्रकल्प संचालक व ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे यांनी नमुद केले.

  कुंभार समाजाला आज रस्त्यावर उभे राहून त्यांचे उत्पादन विक्री करावे लागत आहे.त्या तुलनेत त्यांना मोबदलाही मिळत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा समाज दुबळा होत आहे. मात्र, त्यांचीच उत्पादने मॉल, विविध प्रदर्शनीमध्ये मोठ्या किमतीत विकली जात आहे. या समाजाला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वयंम्‌ फाऊंडेशन, ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल, खादी व ग्रामोद्योग अभियान संयुक्तपणे उपक्रम राबवित आहे.

  या उपक्रमांतर्गत कुंभार समाज व त्यांच्या कलेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे पारसे यांनी नमुद केले. या उपक्रमाला ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे अध्यक्ष व संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व स्वयंम्‌ फाऊंडेशनचे चारुदत्त बोकारे यांचेही सहकार्य मिळत आहेत.

  कुंभार समाज व त्यांच्या कलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनातून कुंभार समाजाला त्यांचे उत्पादन ऑनलाईन विक्री करता यावे, यासाठी www.ekumbhar.in हे संकेतस्थळ तयार करण्याचे काम सुरू आहे.

  भारतातील अशाप्रकारचे हे एकमेव संकेतस्थळ असून कुंभार समाजाला त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाचे फोटो यावर ‘अपलोड’ करता येईल. यातून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळेलच, शिवाय त्यांची आर्थिक प्रगतीही होईल.

  – अजित पारसे, प्रकल्प संचालक व सचिव, ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन.

  केवी आयसी चे डायरेक्टर चंदू कापसे,ग्रीन कुड अँड ब्योफूल चे डॉक्टर, हेमंत जांभेकर, स्वयम फाउंडेशन चे चारुदत्त बोकारे. अनिल चौहान,राजेश पुरोहित, युवा वर्गाचे, हर्षवर्धन फुके, व इतर मान्यवर व प्रामुख्याने कुंभार समाजाला शोषलं मीडिया द्वारे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे अजित पारसे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145