Published On : Sat, Oct 12th, 2019

कमळावर मत विकासाला-सुरक्षेला मत : पालकमंत्री बावनकुळे

बिडगाव, खरबी बहादुरा, गोन्हीसिम येथे प्रचाराचा धडाका

नागपूर: आपल्या भागाचा विकास करायचा असेल आणि सामाजिक सुरक्षा हवी असेल तर कमळाला मतदान करा. कमळावर दिलेले मत हे विकासासोबतच सुरक्षेला दिलेले मत राहणार आहे. मतदारांच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे असे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे उमेदवार टेकचंद सावरकर यांना विजयी करा, असे आवाहन केले.

बिडगाव, खरबी बहादुरा व गोन्हीसिम येथे गावांमधील वस्त्यांमध्ये जाऊन पालकमंत्री बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना, बरिएमं व रिपाई महायुतीचे उमेदवार टेकचंद सावरकर यांच्यासाठी प्रचारसभा घेऊन प्रचाराचा धडाका केला. यावेळी त्यांच्यासोबत तीनही भागातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच उमेदवार टेकचंद सावरकर राजकुमार वंजारी, शुभांगी गायधने, रवी गायधने, बंडू वैद्य, नरेंद्र नांदूरकर, भोला कुरटकर, पप्पू राऊत, माधव माकडे आदी उपस्थित होते.

बिडगावात रमेश चिकटे, तिजारे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. बिडगाव येथे नागेश्वरनगर, आराधना नगर, जुनी वस्ती, गुरुकृपानगर, रामनगर, कमलनगर, गंंगानगर, जिजामातानगर या भागात पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांशी संपर्क करून बैठकी घेतल्या व भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

खरबी बहादुरा येथे जुनी वस्ती हनुमाननगर, शिवमंदिर साईबाबनगर, राखुंडेनगर, गवळीबाबा हनुमान मंदिराजवळ, मिलननगर, शिक्षक कॉलनी, मानवनगर, राऊतनगर या भागातील नागरिकांशी संपर्क केला. गोन्हीसिम येथे विनोबा नगर, पवनपुत्रनगर, हनुमान नगर, साईनगर, जयहिंद नगर, टेक ऑफ सिटी या भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.


या तीनही भागांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते आणि गावातील नागरिक उत्साहाने पालकमंत्र्यांसोबत फिरून प्रचारात सहभागी झाले होते.
बहादुरा येथे नवनाथ नगर, मोहितनगर, मॉ शारदानगर, बहादुरा गाव व संत गजानननगर या भागातील नागरिकांच्या भेटी पालकमंत्र्यांनी घेतल्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या.

या प्रचारात पालकमंत्री बावनकुळे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर आपल्या भाषणातून भर दिला. कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे. प्रत्येक बुथवर 75 टक्केपेक्षा जास्त मतदान झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे. तसेच काँग्रेसकडे एकही मत जाता कामा नये यासाठी आतापासूनच प्रत्येक घरी शासनाने केलेल्या कामांची माहिती पोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.