नागपूर : नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत अमली पदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला असून तहसील पोलिसांनी स्वतंत्र दोन कारवायांमध्ये एमडी (मेफेड्रोन) पावडरची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ५ लाख रुपयांचा एमडी पावडर, मोबाईल फोन आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेदरम्यान तहसील पोलिसांनी ही कारवाई केली. पहिल्या प्रकरणात गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे क्वार्टर परिसरातून २५ वर्षीय मोहम्मद सुफियान मोहम्मद नासिर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे १२ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून त्याची किंमत सुमारे १ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसऱ्या कारवाईत मेयो रुग्णालय परिसरातून २८ वर्षीय मोहम्मद शायान नदीम सैफी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४ ग्रॅम एमडी पावडर, एक मोबाईल फोन आणि एक कार असा सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक तपासात एका प्रकरणातील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे हैदराबादपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले असून त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. अमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून संबंधित आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





