Published On : Sat, Aug 1st, 2020

नागपुरात एक लाखाची हेरॉईन जप्त

नागपूर : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी शांतिनगर परिसरात आरोपी रजनीश सुरेश पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये कि मतीची २५ ग्राम हेरॉईन जप्त केली.

शिवाय २७ हजार रुपयाचे देशी विदेशी मद्यही पोलिसांनी जप्त केले.

आरोपी पाटीलला पोलिसांनी पकडले, हे लक्षात येताच पाटीलच्या साथीदार चंदा ठाकूर आणि तिची मुलगी आरती ठाकूर तसेच बाली पवनीकर पळून गेल्या.