| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Nov 7th, 2020

  बड़ेगांव टेम्भूर्डो जवळ ट्रकचा अपघातात एकाचा जागीच मृत्यू

  खापा बडेगांव मार्गावर टेम्भूर्डो शिवारात सकाळी सहाच्या दरम्यान अशोक लेलैंड मिनी माल वाहक ट्रकचा नियंत्रण सुटल्याने ट्रक विपरीत दिष्याने जावून धडकला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी नजीकच्या सावनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

  मिळलेल्या माहितीनुसार अशोक लेलैंडचा मिनी माल वाहक ट्रक क्रमांक MH-40-BG-4746 हा बड़ेगांव वरुन तो सकाळी सहाच्या दरम्यान सावनेरकडे निघाला होता.त्या ट्रकमध्ये माँगच्या डालयात बड़ेगांवचा आकाश दिनकरराव चौधरी व त्याचे मित्र बसून जामसावली हनुमान मंदिर दर्शना करिता निघाले होते. परंतु बड़ेगांव खापा सिरोंजी मार्गावर टेम्भूर्डो जवळ ट्रकचा नियंत्रण सुटल्याने ट्रकचा अपघात झाला.

  त्या अपघातात आकाश दिनकरराव चौधरी,वय २७,रा. बड़ेगांव यांचा जागीच मृत्यु झाला असून व त्याचे मित्र गंभीर जख्मी झालेले आहेत .घटनेची माहिती मिळताच खापा पोलिस घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात हलवले आहे. घटनास्थळी पोलीस हवलदार प्रमोद बंसोड ,अशोक चटप उपस्थित होते या घटनेची नोंद खापा पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास खापा पोलीस करित आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145