Published On : Mon, Mar 8th, 2021

इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

महिला दिनानिमित्त धरमपेठ झोन सभापतींचा पुढाकार

नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर येणाऱ्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला. तसेच कोव्हिड – १९ मध्ये काम केलेल्या अधिकारी- कर्मचा-यांच्या देखील पुष्प देऊन देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी झोन सभापती सुनील हिरणवार यांच्यासह सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांचन किम्मतकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगला पुरी, डॉ.मयुरी, ज्योती मानकर, रेणुका बावनकर, रेखा रेवतकर, माधुरी आगरकर, वंदना पेंडाम, सुरेखा पंडीत, रजनी फुलझेले, जया तांबे, सुनिता पंधरे, दिपाली पटले, ज्योत्सना विरुळकर व विजय कुंभारे आदी उपस्थित होते.