Published On : Thu, May 14th, 2020

पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून नागपूर महानगरपालिकेच्या दवाखान्यांना एक कोटी 90 लक्ष निधी मंजूर

पाचपावली, सदर, इमामवाडा, केटी नगर, इंदिरा गांधी रुग्णालये “कोविड हेल्थ सेंटर” म्हणून विकसित होणार

नागपूर : नागपूर महानगर पालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने महानगर पालिकेचे दवाखाने विकसित करण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती आणि या कामासाठी सुमारे 1 कोटी 90 लक्ष एवढ्या निधीची आवश्यकता होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 1 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी महानगरपालिकेस देण्यास मंजुरी प्रदान केली आहे. नागपुरात ५ कोविड हेल्थ सेंटर विकसित होतील असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

Advertisement

ह्यामध्ये, पाचपावली दवाखाना, सदर दवाखाना, केटी नगर दवाखाना, इमामवाडा विलगीकरण केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालय अशी एकूण पाच दवाखाने विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दवाखान्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती.

Advertisement

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने 28 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार कोविड-१९ प्रादुर्भावावरील अनुज्ञेय उपाय योजनांकरिता राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व आरोग्य संस्थांकरिता सन 2020-21 या आर्थिक वर्षात मंजुरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ह्या आर्थिक मंजुरीमुळे, नागपुरातील जनतेला महानगरपालिकेच्या दवाखाने व रूग्णालयात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement