Published On : Thu, Jun 27th, 2019

लग तिसऱ्या दिवशी नासुप्र’ची अतिक्रमण कार्यवाही ७ जेसीबी व ३ टिप्पर’चा वापर

कार्यवाही दरम्यान २५ कर्मचारी व १० पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती

नागपूर : उत्तर अंबाझरी मार्गावरील मौजा लेंड्रा येथील नागपूर सुधार प्रन्यासची २.९४ एकर जागा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ला हस्तांतरित करावयाची असल्यामुळे ०.५ एकर जागेवर अस्तित्वात असलेले श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अतिक्रमण काढण्यासाठी आज सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली.

Advertisement

सदर जागेवर तळ आणि पहिल्या माळ्यावर शाळेचे २३८००.०० चौ.फूट क्षेत्रफळाचे बांधकाम होते. शाळेच्या परिसरात शिवमंदिर व हनुमान मंदिराचे अनधिकृत धार्मिक स्थळाचे सुद्धा बांधकाम करण्यात आले होते. तसेच कार्यवाही दरम्यान आदर्श सरस्वती सदन हायस्कुल या शाळेला परिसर रिक्त करण्याकरीता २ दिवसांची मुदत देण्यात आली होती. आदर्श शाळेची शासनाकडून रामनगर परिसर येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत स्तलांतरणाची सोय झाल्यानंतर या शाळेची रिक्त झालेली इमारत तोडण्याची कार्यवाही देखील आज करण्यात आली. या संपूर्ण कार्यवाहीकरिता ७ जेसीबी व ३ टिप्पर’चा वापर करण्यात आला.

Advertisement

उल्लेखनीय आहे कि, २.९४ एकर सार्वजनिक उपयोगाच्या जागेवरील ०.५ एकर जागेचा ताबा मा. सर्वोच्च न्यायालयाचे अपील प्रकरण (सी) २७००१-२७००२/२०१४ मधील दिनांक १८/०२/२०१९ चे आदेशान्वये दिनांक २५/०३/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे घेण्यात आला होता.

सदर कार्यवाही दरम्यान विभागीय अधिकारी (पश्चिम) श्री अविनाश बडगे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्रीमती पुष्पा शहारे, स्थापत्य अभि सहाय्यक श्री अभय वासनिक व क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील तसेच २५ कर्मचारी आणि १० पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement