Published On : Thu, Jun 27th, 2019

कन्हान नगरपरिषद प्रभाग क़्र ४ ची ९ लाखाची नाली चोरी

नगरसेविका आष्टणकर यांची पोलीस स्टेशनला तक्रार देऊन कारवाई ची मागणी.

कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या प्रभाग क्र ४ मधील शिवाजी नगराती ल नाली चोरी गेल्याची धक्कादायक प्रकरण माहीतीच्या अधिकारातुन पुृढे आली आहे. नाली बांधकाम न करता लाखो रुपयांची उचल संबंधित कंत्राटदा राने केली असुन प्रभाग क्र ४ च्या शिवसेना नगरसेविका सौ करूणाताई आष्टणकर यांनी या संबंधात कन्हान पोलीस स्टेशनला तक्रार देऊन नाली चोरी प्रकरणाची चौकशी करून संबंधित सर्व दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सन २०१६ – १७ अंतर्गत प्रभाग क्र. ४ मधिल शिवाजी नगरातील काशीनाथ उरकुडे ते मनोज बावने व बापु बघेले ते आटा चक्की पर्यंत अंदाजे एकुण १२० फुट पक्या सिमेंट नालीचे बांधकाम करण्याची मंजुरी दि ०४/०८/२०१६ च्या नगरपरिषदेच्या विशेष सभेत देण्यात आली. त्यानुसार एका हिंदी दैनिक वृत्त पत्रातुन जाहिरात देऊन निविदा काढण्या त आली. दि १५/०७/२०१७ ला मधु कंट्रक्शन व कन्हान नगरपरिषद मध्ये करारनामा करण्यात आला.

परंतु आज तागायत संबंधित नालीचे बांधकाम झाल्याचे कसलेही निर्देशात येत नाही पण संबंधित कंत्राटदाराला दि २०/०८/ २०१८ ला एकुण बिल ९ लाख ४४ हजार ४९१ रूपयातुन ७% अमानत रक्कम +२% आयकर +अधिभार १५%+१% ईजीएसटी + १%एसजीएस टी +१% लेबर उपकर + रॉयल्टी + लेबर विमा चे एकुण १ लाख ४४ हजार १७४ रूपये कपात करून ८ लाख १ हजार ३१७ रूपये देण्यात आले आहे.

नाली बांधकाम न झाल्या मुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. न झालेल्या नाली बांधकामाच्या नावावर जनतेच्या व शासनाच्या लाखो रूपयाच्या चुराडा झाल्यामुळे नागरिकांत तिव्र संताप व्यकत होत असुन प्रभाग क्र ४ च्या नगरसेविका करूणाताई आष्टणकर हयाच्या तक्रारीवर कन्हान पोलीस स्टेशन व संबंधित उच्च अधिकारी कधी व कोणती कडक कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.