Published On : Thu, Jun 27th, 2019

अज्ञात कारच्या धडकेने नवविवाहीत महिलेचा अपघाती मृत्यु

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या लिहिगाव महामार्गावरून गादाकडे असलेल्या राहत्या घरी नवविवाहित पती -पत्नी दुचाकीने जात असता भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कारचालकाने दिलेल्या धडकेतून घडलेल्या गंभीर अपघातात जख्मि झालेल्या पती पत्नी मधून नवविवाहित पत्नी चा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी 10 वाजता घडली असून मृतक महिलेचे नाव संगीता विनोद सहारे वय 20 वर्षे रा गादा तालुका कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिलेचे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी( बु) रहिवासी विनोद प्रभुजी सहारे वय 26 वर्षे यांच्याशी विवाहबद्ध झाले. यानंतर रोजगारापोटी लिहिगाव येथील एका खाजगी कंपनीत मिळालेल्या रोजगाराची संधी साधून दोघेही पत्नी पत्नीने मूळ गाव सोडून कामठी तालुक्यातील गादा गावातील देविदास ठाकरे यांच्या घरी भाड्याने राहत वैवाहिक जीवनाची कास धरत रोजगार करून सुखी जीवन नांदत होते

Advertisement

यानुसार 23 जून ला रात्री साडे आठ दरम्यान दोघेही पती पत्नी दुचाकीने लिहिगाव फाट्यावरून पेट्रोलपंप समोरून गादा गावाकडे जात असता मागेहुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक देऊन पळ काढण्यात यश गाठले तर जख्मि दुचाकीचालक पती व सोबतीला असलेली पत्नी ही खाली पडल्याने गँभिर जख्मि झाले दरम्यान वेळीच मदतीला धावलेल्या नागरिकांच्या मदतीने नागपूर येथील तारांगण हॉस्पिटल ला उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दोन्ही जख्मि पती पत्नीवर उपचार सुरू असता उपचारादरम्यान पत्नी संगीता सहारे मरण पावल्याची घटना सकाळी 10 वाजता घडली .यासंदर्भात फिर्यादी विनोद सहारे यांनी स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 279, 337, 34 सहकलम 134, 177 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement