Published On : Tue, May 28th, 2019

कामठी पोलीस चौकीसमोर अज्ञात ट्रक च्या धडकेने दुचाकीस्वार शेतमजुराचा जागीच मृत्यू, एक जख्मि

Advertisement

कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी रेल्वे चौकी जवळील कामठी पोलीस चौकी समोरील कामठी- आजनी मार्गावर कामठी हुन आजनी(रडके) कडे दुचाकीने डबल सीट जात असलेल्या दुचाकीस्वार शेतमजुराला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रक ने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या अपघातात शेतमजूर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर मित्र गंभीर जख्मि झाल्याची दुर्दैवी घटना काल 27 मे ला रात्री साडे दहा दरम्यान घडली असून मृतक शेतमजूर तरुणाचे नाव वीरेंद्र धरामसिंग जजपेले वय 30 वर्षे तर जख्मि चे नाव अजय शिवप्रसाद यादव वय 32 वर्षे दोन्ही राहणार आजनी (रडके)कामठी असे आहे.

प्राप्त माहितीनुसार सदर मृतक व जख्मि हे दोघेही कामठी हुन बजाज बॉक्सर दुचाकी क्र एम एच 31 ए डब्लू 8058 ने आजनी येथील राहत्या घराकडे सदर घटनास्थळ मार्गे जात असता आजनी कामठी बाह्य वळण मार्गावरील पोलीस चौकी समोर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत घडलेल्या अपघातातून दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू तर सहपाठी मित्र गंभीर झाला .घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी साठी शवविच्छेदनार्थ मृतदेह कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तसेच यासंदर्भात फिर्यादी मृतकाचे वडील धरमसिंग जजपेले वय 60 वर्षे रा आजनी कामठी यांनी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालका विरुद्ध भादवी कलम 279, 338, 304(अ)भादवी सहकलम 184 मोटर वाहन कायदा अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला तर जख्मि अजय यादव ला उपचारार्थ नागपूर च्या सक्करदरा येथील श्री हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मृतकाच्या पाठीमागे वडील , पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे.

Gold Rate
31 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,34,100/-
Gold 22 KT ₹ 1,24,700 /-
Silver/Kg ₹ 2,38,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मृतक वीरेंद्र जजपेले हा मूळचा मध्यप्रदेश येथील रहिवासी असून मृतकाचे वडील धर्मसिंग जजपेले हे आजनी येथील नितीन रडके यांच्या शेतात शेतमजूर म्हणून कार्यरत आहेत तर दोन वर्षांपूर्वीच सदर मृतक नितीन रडके यांच्या शेतात येऊन ट्रेकटर चालक म्हणून कार्यरत होता अनावधनाने हा अपघाती मृतक प्रकार घडल्याने एकच धक्का बसला तरी पोलीस चौकी समोर अपघात घडूनही पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी ट्रकचालकाचा थांगपत्ता लागत नाही हे एक आश्चर्यच आहे तसेच या चौकात लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता घटनेवेळी सर्वर डॉउन असल्याच्या नावाखाली माहिती मिळू शकत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका कुशंका निर्माण करण्यात येत आहे.तसेच गावकऱ्यात पोलीस प्रशासनाविषयो रोष निर्माण झाला होता.

– संदीप कांबळे

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement