Published On : Fri, Jun 9th, 2023

म.न.पा.त क्रांतीसुर्य बिरसा मुंडा पुण्यतिथी निमित्त

नागपूर : थोर क्रांतीकारक, जननायक व आदिवासी समाजसुधारक ‍बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दि. 09 जुन, २०23 रोजी म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील शहीद बिरसा मुंडा यांच्या पुर्णकृती तैलचित्राला म.न.पा.तर्फे माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, वृंदा मुडे, सुरेश शिवनकर, विलास धुर्वे, प्रमोद बाराई, श्याम माटे, विलास बोरकर, राजु मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement