Published On : Fri, Jun 9th, 2023

नागपुरात G-20 च्या सजावटीनंतर तिरंग्याचा अवमान? नागरिक संतापले

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपुरात G-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. २० देशातील विदेशी पाहुणे नागपूर शहरात येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी नागपूर शहर महापालिकेकडून सुशोभित करण्यात आले होते. मात्र G-20 परिषदेनंतर मनीष नगर अंडर ब्रिज जवळील परिसराला सुशोभित करणारा तिरंगा ध्वजाचा नागपूर प्रशासनाकडून अवमान करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे मनीष नगर येथील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून G-20 परिषदेला वाद पुन्हा एकदा पेटला आहे.

राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहराला G-20 परिषदेदरम्यान आकर्षक रंगरंगोटी आणि मनमोहक रोषणाईने सजविले होते. या कार्यक्रमासाठी झालेल्या अवाजवी खर्चामुळे नागपूर प्रशासनावर सडकून टीका करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या तिरंग्या ध्वजाच्या अवमानामुळे नागपूर प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

Advertisement

मनीष नगर अंडर ब्रीजजवळील नाला लपविण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या तिरंगा ध्वजाकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्राचा अभिमान आणि एकात्मतेचे प्रतिक असलेला ध्वज फाटलेला अवस्थेत लटकलेला आहे. जो शहराला सुशोभित करणार्‍या G-20 सजावटीच्या भव्यतेच्या अगदी उलट आहे. तिरंगा ध्वजाची दुरवस्था हा राष्ट्राच्या प्रतीकाचा अपमान असल्याचे सांगत मनीष नगरमधील रहिवाशांनी नागपूर प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement
Advertisement