Advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तुमचाही दाभोळकर होणार अशा आशयाची धमकी पवारांना देण्यात आली. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याअगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही धमकीचा फोन आला होता.आता या प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाला उच्च परंपरा आहे. राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्यांना धमक्या देणे, समाजमाध्यमांवर व्यक्त होताना मर्यादा ओलांडणे हे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणात कायद्याप्रमाणे निश्चित कारवाई करतील. या प्रकरणावर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.