Published On : Mon, Jan 3rd, 2022

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त म.न.पा. व्दारा विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर : अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त सुभाष रोड उद्यान तसेच महात्मा फुले मार्केट स्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मा.महापौर श्री.दयाशंकर तिवारी, मा.उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे, वार्डाच्या नगरसेविका श्रीमती हर्षला साबळे, नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेविका श्रीमती लता काटगाये, माजी उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे, माजी नगरसेविका निता ठाकरे, माजी नगरसेवक श्री. मनोज साबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने अभिवादन केले.

Advertisement

या प्रसंगी सर्वश्री.सुभाष घाटे, राजेश हातीबेड, श्रीमती प्रेरणा कदम, रेखा घनतुळावर आदी उपस्थित होते.

तसेच म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील स्थायी समिती सभा कक्षात महापौर दयाशंकर तिवारी, अति.आयुक्त दिपक कुमार मीना, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, गांधीबाग झोन सभापती श्रीमती श्रध्दा पाठक, उपायुक्त श्री. रविन्द्र भेलावे, निगम अधीक्षक श्री. पांडुरंग शिंदे, श्री. मदन सुभेदार विशेष कार्यसन अधिकारी, सहा. अधिक्षक राजकुमार मेश्राम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन नगरीच्या वतीने अभिवादन केले.