Published On : Mon, Jan 3rd, 2022

नासुप्र येथे सावित्रीबाई फुले यांची १९१वी जयंती साजरी

Advertisement

नागपूर: चूल आणि मूल सारख्या रूढीवादी परंपरेतून स्त्रियांना मुक्त करणारी भारताची पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका स्त्री, अनाथांची माता आणि स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १९१वी जयंती आज सोमवार, दिनांक ०३ जानेवारी रोजी सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली.

नासुप्रचे महाव्यवस्थापक श्री. निशिकांत सुके यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘नामप्रविप्रा’मध्ये नगर रचना विभागाचे उप-संचालक श्री. लांडे व कार्यकारी अधिकारी श्री. अनिल राठोड, कार्यकारी अभियंता श्री. राजेश मेघराजानी आणि आस्थापना अधिकारी तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. योगीराज अवदूत तसेच नासुप्र व नामप्रविप्रा’चे इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement