Published On : Mon, Jan 3rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

बाबुपेठ येथील मनपा शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Advertisement

जिल्हाधिकारी, महापौर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महापौर राखी कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.

Gold Rate
22 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,24,100 /-
Gold 22 KT ₹ 1,15,400/-
Silver/Kg ₹ 1,55,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका कल्पना बगुळकर, सहायक आयुक्त विद्या पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपाचे शिक्षण अधिकारी नागेश नीत यांनी केले. पाच वर्षांपूर्वी या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या केवळ 70 होती. मात्र महानगरपालिकेने माडेल स्कूल म्हणून विकसित केल्यानंतर आज शाळेत 970 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, अशी माहिती नागेश नित यांनी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वराज्य जननी जिजामाता यांच्या प्रतिमेला दीपप्रज्ज्वलन करून अभिवादन करण्यात आले. 2022 या वर्षानिमित्त मनपा शाळेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी महापौर राखी कंचरलावार आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

Advertisement
Advertisement