Published On : Thu, May 21st, 2020

राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

21 व्या शतकाचे आवाहन ‍स्वीकारुन भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आणण्यासाठी दूरसंचार तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यांचे कार्यकाळात भरीव कामगिरी करण्यात आली असे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांचा 21 मे हा स्मृतीदिन देशभर “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” म्हणून पाळण्यात येतो.

म.न.पा केन्द्रीय कार्यालयात दिवंगत राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या छायाचित्राला कार्यकारी महापौर श्रीमती मनीषा कोठे, आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती श्री. विजय (पिंटू) झलके, सत्तापक्षनेते श्री. संदीप जाधव, विरोधी पक्षनेते श्री. तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच विरोधी पक्षनेता कक्षातील स्व. राजीव गांधी यांच्या तैलचित्राला उपस्थितांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी कार्यकारी महापौर श्रीमती मनीषा कोठे यांनी उपस्थीतांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली. समस्त मानव जातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणी सामंजस्य टिकविण्यासाठी व वर्धीष्णू करण्यासाठी यावेळी प्रतिज्ञा घेण्यात आली.