Published On : Sun, Aug 16th, 2020

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तयाने मंदार मंगळे यांचा नेतृत्वात व्रुद्धाश्रमात अन्नदान व औषदी वाटप करण्यात आले.

सावनेर – ७४व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शानिवारी सरकारी इमारती, शाळा, महाविद्यालये तसेच खासगी गृहसंकुलांमध्येही स्वतंत्र भारता चा सन्मान करत ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याची जाणीव मनात अधिकच अधोरेखित करणारा हा तिरंगा सूर्यास्तापर्यंत ठिकठिकाणी डौलाने फडकत होता.

अनेक ठिकाणी सकाळपासून देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. येणाऱ्या पिढ्यांना स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी नेमकी काय किंमत मोजली याची जाणीव या निमित्ताने करून दिली गेली. तर काही ठिकाणी ‘भारतमाता की जय’ असे नारे देत झेंडे फडकवले जात होते. या निमित्ताने भाजपा युवा मोर्चा सावनेरचे अध्यक्ष मंदार मंगळे व मित्र परिवार यानी काही वेगडया पद्धतीने साजरा केला.

त्यानी स्वामी विवेकानंद व्रुद्धाश्रमात अन्नदान व औषदी वाटप करुण साजरा केला.त्याच बरोबर कोरोना संक्रमण बाबत व्रुद्धाश्रमात मार्गदर्शन व माहिती देण्यात आले. आरोग्यपूर्ण जीवन, चांगल्या पर्यावरणात, वातावरणात जगण्याचा हक्क हेसुद्धा स्वातंत्र्य या संकल्पनेचे याची जाणीवही या निमित्ताने करून देण्यात आली. याप्रसंगी विलास मानकर,संजय जवाहर, पंकज चरपे, विजय निखाड़े, गुड्डू घोड़े,अभिषेक गुप्ता, रवि वरघट, प्रभाकर वाड़ी,बाल्या कथावते,रमेश घोड़े सहभाग होते.

दिनेश दमाहे 9370868686