Published On : Sun, Aug 16th, 2020

कामठी तालुक्यात ठिकठिकानी ध्वजारोहण उत्साहात

Advertisement

संदीप कांबळे कामठी

कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिन कामठी तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानुसार कामठी तहसील कार्यालयात सोशल डिस्टॅनस्शिंग चे पालन करीत स्वातंत्र्य सेनानी रतनलाल पहाडी यांच्या मुख्य उपस्थितीत तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत तिरंगी झेंड्याला सलामी दिली याप्रसंगी परिक्षाविधींन तहसिलदार शिकतोडे, नायब तहसिलदार रणजित दुसावार, नायब तहसीलदार उके, नायब तहसीलदार सुनील तरुडकर, नायब तहसिलदार कावटी तसेच परिक्षाविधीन नायब तहसोलदार माळी , अमोल पौड, शेख, महेश कुलदिवार, अनवाणे, राजेश काठोके तसेच माजी आमदार देवराव रडके, कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान , माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे आदी उपस्थित होते.

कामठी नगर परिषद येथे नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप बोरकर, उपाध्यक्ष, नगरसेवक ,नगरसेविका यासह नगर परिषद कार्यालयीन समस्त अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शासकोय उपजिल्हा रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रद्धा भाजीपाले यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच रुग्णालयातील कोविड योद्धा म्हणून कर्तव्यदक्ष भूमिका बजावणाऱ्या वैद्यकिय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संतोष बाकल तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी पोलीस स्टेशन चे समस्त पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

पटेल न्यूज पेपर एजन्सी च्या वतीने बस स्टँड चौकात प्रा हैदरी सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व सेवानिवृत्त शिक्षक सुरेश अढाऊ, कृष्णा पटेल, कामठी नगर परिषद चे सार्वजनिक बांधकाम सभापती मो अकरम, कामठी वकील संघटनेचे पदाधिकारी ऍड पंकज यादव, सुनील बडोले, अजय करियार, नागसेन गजभिये, सुभान भाई, कोमल लेंढारे ,रायभान गजभिये, मनोज रंगारी,राजेश गजभिये, रोशन रामटेके, विजय जैस्वाल, कनोजिया, आसाराम हलमारे तसेच सदभावना ग्रुप चे समस्त पदाधिकारी व सदस्यगन तसेच हुसेन अली, शुभम ठाकूर सलीम भाई,राजेश काटरपवार, प्रफुल लूटे, सतीश दहाट,राजू मेश्राम, दिपंकर गणवीर, शेख सज्जक, देवा कांबळे, प्रामुख्याने उपस्थित होते. यासह विविध राजकीय , सामाजिक संघटनांच्या वतीने सुद्धा ध्वजारोहण करण्यात आले .