Published On : Sun, Aug 16th, 2020

कोरोनायोद्धा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

कामठी :- ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’या संकल्पनेतून कर्तव्य बजावत असलेले नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल ,डी बी स्कॉड चे पोलीस कर्मचारी मंगेश यादव, हर्ष वासनिक तसेच कमल कनोजिया हे कोरोनाबधित आढळले असता यांनी कोरोनावर मात करोत 14 दिवसाचा उपचार घेत पुनःश्च जनसेवा हितार्थ आज 14 ऑगस्ट पासून कर्तव्यावर हजर झाले

तेव्हा अशा कोरोना योद्धाचा मनोबल मजबूत करण्याच्या उद्देशाने आज 14 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशन च्या वतीने कोरोना योद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल , पोलीस कर्मचारी मंगेश यादव, हर्ष वासनिक, कमल कनोजिया चा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उज्वल भविष्याच्याया शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी गुन्हे पोलीस निरीक्षक आर आर पाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्नाके, डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार, सुधीर कनोजिया, राजा टाकळीकर ,महेश नाईक यासह पोलीस स्टेशन चे समस्त पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी
f