Published On : Fri, May 11th, 2018

दिलखुलास मध्ये उद्या रोजी कृषी पर्यटन तज्ज्ञ पांडुरंग तावरे

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दि. 16 मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन तज्ज्ञ पांडुरंग तावरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शनिवार दि. 12 मे, सोमवार दि. 14 आणि मंगळवार दि.15 मे रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कृषी पर्यटन व्यवसायाची सद्यस्थिती, त्यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूक, पायाभूत सुविधा, अडचणी व मर्यादा, कृषी पर्यटन उद्योग करू इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण,रोजगार निर्मिती, शासनाचे धोरणात्मक निर्णय तसेच मुंबई येथे 16 मे रोजी आयोजित करण्यात येणारी ‘कृषी पर्यटन परिषद 2018’ याबाबतची माहिती श्री. तावरे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.