Published On : Fri, Aug 9th, 2019

ओम साईनगर कळमना मध्ये नागरी सुविधांची वानवा

कामठी : कळमना येथील ओम साईनगर मधे एन आय टी चा बगिचा आहे. या बगिच्या समोरील भागावर येथील लोकांनी तिथे अतिक्रम करून आपली मक्तेदारी सुरू केली आहे. या जागेवर गाई बकऱ्या बंधने आपली वाहन ठेवणे असा प्रकार सुरू असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. संध्याकाळी असामाजिक तत्वाचा वावर इथे असतो .गांजा दारू मंदिराच्या परिसरात ओढला जातो. सभोवताली अतिशय घाणेरडे वातावरण तयार झाले आहे यामुळे येथिल नागरिकांना फार त्रास होतो .

नगरसेवक प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. केवळ निवडणूका जवळ आल्या कि नागरिकांना भूलथापा देतात . हि इथे नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा नाही.रुग्णांसाठी दवाखान्याचा अभाव असून शिकणाऱ्या मुलांसाठी शाळा व महाविद्यालय नासल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागते.

या भागात वराहांचा हैदोस वाढला असून या भागातील रस्ते देखील खराब झाले आहे।प्रशासनाने त्वरित नागरी सुविधांकडे लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहे. या सर्व गोष्टींची माहिती नगरसेवक गोतमारे आणि पाटील यांना माहिती असून सुद्धा जाणिव पूर्वक दुर्लक्ष करतात,असा थेट आरोप या भागातील नागरिक करतात.त्यामुळे त्वरित या भागात नागरी सुविधा देण्यात यावी,अशी मागणी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

संदीप कांबळे कामठी