Published On : Fri, Aug 9th, 2019

मानवता धर्म दाखवून देण्याची वेळ आली आहे – नवाब मलिक

‘सांप्रदायिकता छोडो… देश जोडो’चा नारा…

Advertisement

मुंबई : देशात जातीच्या नावाखाली विभाजन करण्याचे काम होत आहे. त्यामुळे मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्याला दाखवून देण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.

Advertisement

क्रांती दिनानिमित्त आज मुंबईतील क्रांती मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुतात्म्यांना वंदन करून घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत नवाब मलिक बोलत होते.

Advertisement

या देशात आपल्या पक्षाच्या विचारधारेला सोबत घेऊन लढा देण्याचे काम आपण करु. सांप्रदायिकता छोडो देश जोडो ही भुमिका आपण घेऊ असेही नवाब मलिक म्हणाले.

आज देशात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पक्षाच्यावतीने या ठिकाणी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईचा कार्यकर्ता या कार्यक्रमात नक्कीच पुढाकार घेईल आणि पुरग्रस्तांना मदत करेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर इतर धर्माचा आदर करणे. धर्माधर्मात होणाऱ्या गैरसमजाला दूर करण्याची जबाबदारी आपली आहे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले.

आपले काही लोक आपल्याला सोडून जातात पण आपला कार्यकर्ता हा खंबीरपणे आपल्यासोबत उभा आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन, मिल मजदूर संघाचे नेते गोविंदराव मोहिते यांनी आपले विचार मांडले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर महानगरपालिकेच्या गटनेत्या नगरसेविका राखी जाधव, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेते गोविंदराव मोहिते, मुंबई प्रशासन अशोक धात्रक, सिध्दीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे आदींसह सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष फ्रंटल सेलचे प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे पदाधिकारी व मिल कामगार उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement