नागपंचमी निमित्ताने सर्प समज गैरसमज जन जागरूकती कार्यक्रम एकलव्य रेसिडेंशियल स्कूल, खैरी परसोडा येथे पार पडले
रामटेक: नागपंचमी निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे समतादूत व वाईल्ड चॅलेंज ऑर्गनायजेशन, रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साप हा सगळ्यांचा मित्र’ या विषयावर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
समतादूत राजेश राठोड यांनी सद्या सापांच्या बिळात पाणी गेले असून ते बाहेर निघत आहेत. स्वतःची काळजी घ्या, प्रत्येक साप विषारी नसतो. केवळ साप मारणे हा पर्याय नाही.तो शेतकरीचा तसेच पर्यावरणाचा मित्र आहे असे सांगितले. वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन सर्प मित्र व प्राणी मित्र अध्यक्ष राहूल कोठेकर यांनी सापाचे प्रकार, समज गैरसमज,सर्प दंशावरील प्राथमिक उपचार याबाबत मार्गदर्शन केले.
प्रबोधनाकरीता बार्टीचे महासंचालक मा.कैलास कणसे, समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे व नागपूर विभागाचे प्रकल्प संचालक मा.पंकज माने,प्रकल्प अधिकारी दिनेश बारई यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम सोनार होते तर प्रमुख पाहुणे वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन सर्प मित्र व प्राणी मित्र राहूल कोठेकर,अजय मेहरकुळे, शुभम वंजारी व अक्षय घोडाकाडे उपस्थित होते. अध्यापिका प्रियंका वाघमारे यांनी सूत्र संचालन केले व आभार मानले. कार्यक्रमास शिक्षकवृंद कृष्णा मडावी,ज्ञानेश्वर सोनटक्के व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.









