Published On : Mon, May 25th, 2020

जुनी कामठी पोलिसांनी दिले सात गोवंश जनावरांना जीवनदान

कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गुजरी बाजार चौकातून जामा मस्जिद कडे टाटा पिकअप क्र एम पी 22 जी 1790 ने अवैधरित्या सात गोवंश जनावरे वाहतूक करुन कत्तलीसाठी वाहून नेत असता जुनी कामठी पोलिसांनी वेळीच सदर वाहनावर

धाड घालून वाहनातील सातही गोवंश जनावरांना ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान देण्यात आल्याची कारवाही सकाळी साडे अकरा वाजता केली असून या धाडीतून 7 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 5 हजार रुपये व जप्त टाटा पिकअप वाहन किमती साडे तीन लक्ष रुपये असा एकूण 4 लक्ष 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोत्पल, एसीपी राजरत्न बन्सोड यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, गुन्हे पोलीस निरीक्षक बलीरामसिंग परदेसी , डी बी स्कॉड चे पवन गजभिये, रोशन पाटील, अंकुश गजभिये, राजू बागडी, अश्वजित फुले, ईश्वर लोंडे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी