| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Jan 13th, 2019

  नागपुर ओमसाईनगरात वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

  नागपूर: तीन मुली आणि एक मुलगा असूनही मानसिक अथवा कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ही करुणाजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.

  बुधरामजी रामाजी कटरे (वय ७०) आणि रामीबाई बुधरामजी कटरे (वय ६५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ते कळमन्यातील ओमसाईनगरात राहत होते. आज सकाळी ६ च्या सुमारास ते फेस गाळत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मेयोतील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  फिर्यादी जितेंद्र बुधरामजी कटरे (वय ३५, रा. इंदिरानगर, निमखेडा मौदा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
  यासंबंधाने कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधरामजीने अनेक वर्षांपूर्वी दुसरा घरठाव केल्याने तीन मुली आणि एक मुलगा असूनही ते कळमन्यात दुसरी पत्नी रामीबाईसोबत निराधार जीवन जगत होते. छोटेसे किराणा दुकानही चालत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक अवस्थाही खराब झाली होती. जगण्याचा आधार नसल्यामुळे शेवटी या वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145