Published On : Sat, Jun 15th, 2019

शिवाजीनगरात ओला कॅब चालकाचा कारमध्येच मृत्यू

नागपूर : कॅब चालकाचा त्याच्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शिवाजीनगरात आज सकाळी खळबळ उडाली. योगेश वसंतराव आपटे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. अत्याधिक दारूच्या सेवनामुळे कारमध्येच पडून राहिल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज प्राथमिक तपासातून पुढे आला आहे.

Advertisement
Advertisement

शिवशक्तीनगर(म्हाळगीनगर)मध्ये राहणारे आपटे वर्षभरापासून ओला कॅबसाठी चालक म्हणून काम करीत होते. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर सिमेंट रोडवर दोन दिवसांपासून स्वीफ्ट कार (एमएच ४९/एफ १२७७) बेवारस अवस्थेत उभी होती.

Advertisement

बाजूच्यांनी उत्सुकतेपोटी कारच्या काचेतून आत डोकावले. त्यात वाहनचालकाच्या सीटवर एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत दिसला. तो कोणतीही हालचाल करीत नसल्याने एकाने अंबाझरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी लगेच तेथे धाव घेतली. कारच्या आतमध्ये आपटे मृतावस्थेत पडून होते. त्यांच्या खिशातून काढलेल्या कागदपत्रांवरून पोलिसांना त्यांचा नाव पत्ता कळला.

Advertisement

पोलिसांनी आपटेंच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. मृतदेह मेडिकलमध्ये रवाना करण्यात आला. प्राथमिक तपासात आपटेंना दारूचे व्यसन होते. त्यामुळे दारूच्या नशेत ते कुठेही राहायचे. दोन-तीन दिवस ते घरी येत नव्हते. दोन दिवसांपूर्वी ते घराबाहेर पडले होते. घरच्यांनी त्यांना शुक्रवारी फोन केला. त्यांचा मोबाईल वाजत होता, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. आपटेंचा मृत्यू दारूच्या अत्याधिक सेवनामुळे किंवा दारूच्या नशेत त्यांना झोपलेल्या अवस्थेत हृदयविकाराचा झटका येऊन झाला असावा, असा अंदाज ठाणेदार महेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना वर्तविला. दरम्यान, अभय बबनराव घोरे (वय ३९, रा. नवीन शुक्रवारी, राम कूलरजवळ, कोतवाली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement