Published On : Tue, Jul 23rd, 2019

अधिकारी वर्गाने वीज ग्राहकांच्या संपर्कात राहणे गरजेचे- घुगल

Advertisement

महावितरणच्या सेवा ग्राहकाभिमुख करण्यासाठी अधिकारी वर्गाने वीज ग्राहकांच्या संपर्कात राहणे गरजेचे असून संवाद मेळावा याचाच एक भाग असल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी आज धापेवाडा येथे वीज ग्राहकांच्या संवाद मेळाव्यात दिली.

नागपूर परिमंडलातील महावितरणच्या संवाद मेळाव्याचा शुभारंभ मंगळवारी धापेवाडा येथे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी पुढे बोलताना घुगल म्हणाले की, महावितरण कंपनीचा कारभार अधिक ग्राहकाभिमुख होऊ लागला आहे. वीज ग्राहकांसाठी महावितरण कंपनीने वीज देयकाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणे, एसएमएसच्या माध्यमातून वीज देयकाची भरणा करणे, वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून देणे यासारख्या सुविधा मागील काळात सुरु केल्या आहेत.

या सुवीधांचा लाभ शहरी भागातील वीज ग्राहकांसोबतच ग्रामीण भागातील वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement