Published On : Sat, Jan 25th, 2020

तंबाखूमुक्त अभियान: एनएसएस’चे विद्यार्थी करणार तंबाखूमुक्त समाज

Advertisement

नागपूर: जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स महाविद्यालयातर्फे हिंगणा विधान सभा मतदार क्षेत्र अंतर्गत नागझरी(पीपलधारा), संजिवन वृद्धाश्रम, आमगाव देवळी, तहसील नागपूर याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या एनएसएस कॅम्प मध्ये एनएसएस’च्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूमुक्त अभियानाअंतर्गत तंबाखूमुळे होणाऱ्या तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना दीपक शेंडे, लीलाधर चरपे, वीरेंद्र गोतमारे यांनी तंबाखूसेवनाने होणारे दुष्परिणाम आणि जीवघेणे आजारापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे तर या अभियानाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

यासाठी एनएसएसच्या सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आरोहीतर्फे देण्यात येणार आहे. आरोही बहुद्देशीय संस्था, नागपूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी जी एस कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. तर कार्यक्रमात जी एस कॉलेज’चे ए बी पटले, आरोहीचे सोनल मेश्राम आणि इतर सहकारी उपस्थित होते.