Published On : Sat, Jun 3rd, 2023

ओडिशा ट्रेन अपघात वेदनादायी ; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

ओडिशा – ओडिशाच्या बालासोर या ठिकाणी झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातात २३३ हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. ओडिशा ट्रेन अपघात वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जे अपघातात जखमी झाले आहेत त्यांना लवकर आराम मिळावा म्हणून मी प्रार्थना करतो. तसंच अपघात झालेल्यांना लवकरात लवकर सगळी मदत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये म्हणाले.

Advertisement

दरम्यान ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांना एक भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. या अपघात आतापर्यंत 233 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. अद्यापही घटनास्थळावर बचावकार्य सुरु आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement