नागपूर,: सामाजिक जबाबदारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यप्रती प्रतिबद्धता कायम ठेवत, ऑरेंज सिटी वॉटर (OCW) ने मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने 28 एप्रिल 2025 रोजी OCW कार्यालयात रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले.
या उपक्रमात सर्व झोन, साइट्स आणि प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सुमारे 95 कर्मचाऱ्यांनी रक्तदान करत समाजासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले.
रक्तदानासोबतच आरोग्य तपासणी शिबिर देखील घेण्यात आले. या शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे सर्वसामान्य आरोग्य तपासण्या आणि सल्ला देण्यात आला. 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घेत आपले आरोग्य तपासून घेतले आणि उपयुक्त वैद्यकीय मार्गदर्शन मिळवले.
या उपक्रमाचा उद्देश केवळ समाजासाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे नव्हे, तर कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करणे हाही होता. अशा उपक्रमांद्वारे OCW एक आरोग्यदायी आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार कार्यस्थळ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
जलपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, NMC-OCW हेल्पलाइन नंबर १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधा किंवा contact@ocwindia.com वर मेल करा.