नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपली परंपरा कायम राखत २०१९ ची जलकुंभ स्वच्छता मोहिम सुरु केली असून डिसेंबर ६ , २०१९ ला लक्ष्मी नगर (OLD) जलकुंभाच्या स्वच्छते चे काम करण्याचे ठरविले आहे.
या दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: अभ्यंकर रोड, बजाज नगर, माधव नगर, लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक, निरी, पवार टोळी, माटे चौक, friends ले आउट VNIT, गीत्तीखादन ले आउट, पी & टी ले आउट, राहते ले आउट इन्कम TAX कॉलोनी, आत्रेय ले आउट, SE रेल्वे कॉलोनी, धनगर पुरा, तात्या टोपे नगर, RPTS रोड, जेरील LAWN चौक, राहते कॉलोनी चौक आणि दीक्षाभूमी रोड.
यानंतर लक्ष्मी नगर झोन मधील पुढील जलकुंभ स्वच्छ करण्यात येतील: टाकळी सीम, हिंगणा टी- पॉइंट (९ डिसेंबर), टाकळी सीम संप (९ डिसेंबर), खामला पांडे लेआऊट (११ डिसेंबर), प्रताप नगर (१३ डिसेंबर), जयताळा संप (१४ डिसेंबर) व त्रिमूर्ती नगर नवीन (१६ डिसेंबर).
मनपा-OCW यांनी बाधित भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यादरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.
