Published On : Wed, May 31st, 2023

Video: कऱ्हाडला अभयारण्याजवळील रिसॉर्टवर अश्लील नाचगाण्याचा धिंगाणा; ६ तरुणींसह डॉक्टर, बडे व्यापारी ताब्यात

उमरेड : उमरेड-कऱ्हाडला- पवनी अभयारण्या शेजारी असलेल्या रिसॉर्टवर अश्लील डान्सचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री उघडकीस आला.

माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या नागपूर पथकाने ही कारवाई करत याप्रकरणी १२ पुरुष आणि ६ तरुणी अशा एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

उमरेड तालुक्यातील तिरखुरा शिवारात असलेल्या रिसॉर्टवर हा अश्लील नाचगाण्याचा धिंगाणा सुरू होता. टायगर पॅराडाईज असे या रिसॉर्टचे नाव आहे. रिसॉर्टच्या एका शाही हॉलमध्ये अश्लील डान्स सुरू होता. दुसरीकडे या डान्सवर हवेत पैसे फेकल्या जात होते.

आरोपी नाव :- अरुण अभय मुखर्जी वय 47 वर्ष रा.मनीष नगर फ्लॅट न101 ऑर्किड अपार्टमेंट व इतर 17 पुरुष व महिला

जप्त मुद्देमाल

1) नगदी 1,30, 300 रू, साउंड सिस्टीम, विदेशी दारू , लॅपटॉप 2,व इतर साहित्य असा *एकुण 3,72,324/- रुपयांचा* मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई
मा. पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण श्री. विशाल आनंद साहेब (भा.पो.से) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ.श्री. संदीप पखाले साहेब यांचे मार्गदर्शनात परी. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनिल मस्के (भा. पो. से.) परी.पोलीस उपअधीक्षक श्री झालंटे (म.पो.से.) स्थानिक गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर ,अरविंद भागात, नरेंद्र पटले ,पोलीस नायक बालाजी साखरे ,अजीज शेख, मयूर ढेकले ,अमृत किनगे, रोहन डाखोरे, सत्यशील कोठारे, म पोना स्वाती हिंडोरिया,चालक आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.

या कारवाईत नागपूर शहर आणि मौदा तालुक्यातील डॉक्टरासह मोठे व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement