| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jan 12th, 2021

  ओबीसी महासंघाचे घंटानाद आंदोलन

  आज दि.11 जाने. रोजी आकाशवाणी चौक येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या द्वारे घंटानांद आंदोलन करण्यात आले.

  दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती त्वरित घ्यावी तसेच भरतीमधील ओबीसी प्रवर्गाचा 12,000 पदाचा अनुशेष भरून काढावा. या महत्वाच्या मागणीच्या संदर्भाने आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सांगता मा.गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य.यांना सदर मागण्यांचे निवेदन देऊन करण्यात आली.

  याप्रसंगी मा. आमदार विकासभाऊ ठाकरे, मा. आमदार अभिजित वंजारी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मा. बबनरावजी तायवाडे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145