Published On : Tue, Jul 23rd, 2019

आता प्रधानमंत्री पिकविम्याचा तक्रारी होतील दूर-तहसीलदार अरविंद हिंगे

Advertisement

तहसीलदार अरविंद हिंगे च्या अध्यक्षतेखाली स्थापन झाले तक्रार निवारण केंद्र

कामठी :-पावसाचा लहरीपणामुळे नैसर्गिक नुकसानामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांकडून पीक विमा योजना काढला जातो तेव्हा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची पुरेपूर अंमलबजावणी व्हावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा या मुख्य उद्देशाने शासनाने खरीप हंगाम 2019 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून ही पीक विमा योजना कामठी तालुक्यात सुद्धा लागू असून शासन निर्णयातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठो ही योजना लागू करण्यात आली आहे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभाबाबत तक्रारी वर समाधान करण्यासाठो कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली कामठी तालुकास्तरावर आजपासून तक्रार निवारण केंद्र समिती गठीत करण्यात आली.

Gold Rate
08 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 1,08,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

.या समितीच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार अरविंद हिंगे तर समितीचे सदस्य कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारि सचिन सूर्यवंशी, सदस्य सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारि मंजुषा राऊत, 2 शेतकरी प्रतिनिधी म्हणून सेवक उईके, दिनकर ठाकरे, बँकेचे तालुकास्तरीय प्रतिनिधो, जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधी योगेश कदम, विमा कंपनीचे प्रतिनिधी चक्रपाल बाभळे, आपले सरकार सेवा केंद्रचालकाचे 2 प्रतिनिधी विशाल चामट , योगेश रामगुडेवार यांची नियुक्ती करण्यात आली.

ही तक्रार निवारण समिती तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत यांच्या मार्फत करण्यात आली असून यावेळी तहसिलदार अरविंद हिंगे, पंचायत समिती कृषी अधिकारी शुभांगी कामडी,आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement