नागपूर : जनहीत याचिका क्रमांक ८५११/२००६ मध्ये मा. उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशान्वये नासुप्र’च्या मा. सभापती व मा. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार, दिनांक २३/०७/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे पश्चिम नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई आली.
कारवाई करण्यात आलेल्या धार्मिक स्थळांमध्ये १) हनुमान मंदिर, सहकार नगर २) हनुमान मंदिर, मेहर कॉलनी, सोमलवाडा ३) हनुमान मंदिर, कन्नमवार नगर, सोमलवाडा ४) गणेश मंदिर, प्रिती को. ऑप. सोसायटी या चार धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
सदर कारवाई २ जेसीबी व २ टिप्पर’च्या साह्याने करण्यात आली. कारवाई दरम्यान नासुप्र’च्या पश्चिम विभागातील कार्यकारी अभियंता श्री. अविनाश बडगे, कनिष्ठ अभियंता, श्री. भगवान कुर्झेकर क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील तसेच सोनेगाव पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मनोहर कोटनाके व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.