Published On : Mon, Feb 5th, 2018

आता कामठीत सुद्धा मेट्रो रेल्वेगाडी धावनार : भाजप शहराध्यक्ष विवेक मंगतानी

Advertisement

Vivek Mangtani, Nagpur
नागपुर/कामठी: नागपुर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बद्लविण्यासाठी या क्षेत्राचे आमदार म्हणून भूमिका साकारणारे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सदैव प्रयत्नशील असून मागील वर्षी 8 जानेवारीला झालेल्याकामठी नगर परिषद निवडणुकीच्या पाश्वरभूमिवर नगर परिषद प्रांगनात झालेल्या जाहिर निवडणूक प्रचार सभेत आटोमोटिव चौक ते कामठी मार्गे कन्हान पर्यन्त मेट्रोचा दूसरा टप्पा लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी पालकमंत्री बावनकुले यानी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती यावेळी या दोन्ही नेत्यांनी पालकमंत्री बावनकुले यानी केलेल्या माग्निच्या स्वीकार करीत लवकरच या प्रकल्पला मंजूरी देण्याचे सर्व नागरिकसमोर आश्वासित केले होते या आश्वासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री ना नितिन गडकरी हे खरे उतरले असून बावनकुले यांच्या या अथक प्रयत्नला यशप्रप्त झाले आहे.

यासंदर्भात 3 फेब्रूवारी रोजी नागपुर येथील सेंटर पॉइंट होटल येथे पार पडलेल्या मेट्रो रेल्वेच्या विस्ताराच्या विकास प्रक्रियेच्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्पयाला मंजूरी मिळाली असून ऑटोमोटिव चौक ते कामठी कन्हान पर्यन्त लवकरच मेट्रो रेलवे धावनार आहे व या 13 किलोमीटर च्या मेट्रो रेलवे मार्गावर 13 प्रवासी थांबे राहणार आहेत या यशस्वी कार्यप्रणालीचे श्रेय चंद्रशेखर बावनकुले यांच्य अथक प्रयत्नला जात असून मिळालेल्या या यशबद्दल नागरिकांच्या वतीने भाजप शहराध्यक्ष विवेक मंगतानी यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांचे जाहिर आभार आज झालेल्या पत्रपरिषदेतुन करण्यात आले.

पालकमंत्री ना बावनकुले यांच्या यशस्वी कार्यप्रनालिमुळे शहरात विकासाचा झंजवात होत असून शहरात 90 करोड़ रूपयाच्या निधितुन भूमिगत विज वाहिनी जोडण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे, 12 करोड़ रूपयाच्या निधितून कामठी तालुक्यात सर्व नागरिक सुरक्षाच्या दृष्टिकोनाने सीसीटीव्ही लावून मेट्रो अन्तर्गत नागपुर शहराला जोडण्याचे काम सुरु आहे, 45 करोड़ रूपयाच्या निधितुन विविध समाजभवन, मंदिर, विहार, दरगाह इतर धार्मिक स्थलांचा विकासकार्य, नुक्त्याच झलेल्या महाआरोग्य शिबिरातून जवळपास 30 हजार नागरिकांना आरोग्य सेवा पुरविन्यात आली व कित्येकांचे दिव्यांग शास्त्रक्रिये करण्यात आल्या.या प्रकारच्या विकासकमंचा सुद्धा उल्लेख करित बावनकुले यांचे नागरिक तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते च्या वतीने मनःपूर्वक आभार मनन्यत आले.व अश्या विकासपुरुशाच्या नेतृत्वात पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ही पत्रपरिषद शहराध्यक्ष विवेक मंगतानी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून यावेळी भाजप अनुसूचित जातो मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज चौरे, प्रा.मनीष वाजपेयी, योगेश वाडीभस्मे, नरेश मोटघरे, श्रीकांत शेंद्रे, आशिष वंजारी, सुनील पाटील, कपिल गायधने, राजा देशमुख, उज्वल रायबोले प्रामुख्याने उपस्थित होते.